अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा परिसरातील शेतकरी समाधान सुरकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली भेट भावनिक ठरली. दुष्काळामुळे पाच एकरांतील संपूर्ण पीक हातातून गेल्याने ते हतबल झाले होते. आर्थिक संकट आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने आत्महत्येचे विचार मनात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपल्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांना मोठा मानसिक आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आता आत्महत्या करणार नाही, अशी भावना व्यक्त करत समाधान सुरकर यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकरी समाधान सुरकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली.
Akola | Farmer's emotional interaction with Shinde; government stands firmly behind farmers – Eknath Shinde