FDA ची Juhu तील ISKCON मध्ये कारवाई; गोविंदाज रेस्टॉरंटसह 3 परवाने निलंबित

जुहूतील इस्कॉन येथील खाद्य आस्थापन्यांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गोविंदाज रेस्टॉरंटसह तीन खाद्य आस्थापन्यांचे परवाने FDAने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे अनेक उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. FDAच्या पाहणीत काही ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव, तुंबलेले ड्रेनेज, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी तसेच अन्न आणि पाण्याच्या नियमित तपासणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित आस्थापन्यांविरोधात कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

संबंधित व्हिडीओ