पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी गुजरातच्या वडोदरामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधत विकसित भारताचं व्हिजन सादर केलं. सुमारे ६ हजार तरुण यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून विकास आणि कनेक्टिविटी वर जोर दिला. 'नमो फॉर विकसित भारत' कार्यक्रमात मोदींनी वडोदरासाठी 35 हजार 200 कोटींहून अधिक विकासकामांची भेट दिली. तसंच यावेळी नव्या रेल्वे सेवांना हिरवा झेंडा ही दाखवला.
PM Modi's special gift for Vadodara: Development projects worth 35,000 crore.