Latur च्या सुमठाणा गावात मराठा बांधवानं संपवलं जीवन, Manoj Jarange आणि Uday Samant काय म्हणाले?

लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.सुमठाणा गावातील एका मराठा बांधवाने आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या नागरिकांनी मृतदेह येरोळमोड येथे आणत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही आणि शासनाने मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून घटनास्थळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमा झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ