राज्य सरकारचा गणेशभक्तांना मोठा दिलासा, कोकणात जाणाऱ्या ST लाही Ganeshotsav मध्ये टोलमाफ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही सवलत लागू असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग आणि अटल सेतू मार्गावरील संबंधित टोल नाक्यांवर ही सुविधा मिळणार आहे. गणेशभक्तांसाठी स्वतंत्र पासचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. हा पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य असणार आहे. एसटी बसनाही पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ