रिलीफ हॉस्पिटलविरोधातही गुन्हा दाखल करा, Palghar पोलीस ठाण्याबाहेर Rajendra Gavit यांचा ठिय्या

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणात रिलीफ हॉस्पिटल प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनेते जगदीश चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालघर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जखमी गोविंदालाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गोविंदा गंभीर जखमी नसतानाही केवळ पैशांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली असून, पोलीस ठाण्याबाहेर वातावरण चांगलेच तापले आहे. File a case against Relief Hospital as well, Rajendra Gavit's protest outside Palghar police station

संबंधित व्हिडीओ