१६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेनिमित्त जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची या भारतात आल्या आहेत, बुधवारी त्यांचं भारतात आगमन झालं त्यानंतर गुरुवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भेट झाली.मोदींनी साने ताकाईचींचं जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आपुलकीनं स्वागत केलं. ताकाईची या पंतप्रधान झाल्यानतंर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.