मुंबईत कोसळलेलं झाड पाहण्यासाठी गेलेले 8 जण जखमी, मुंबईत दिवसभरात झाडं पडण्याच्या 91 तक्रारी

मुंबईत झाड अंगावर कोसळल्याने आठ जण जखमी झाले आहेत. सांताक्रूझमध्ये रहेजा कॉलेजशेजारी असलेल्या एका खासगी इमारतीच्या आवारात एक झाड कोसळलं होतं. त्या कोसळलेल्या झाडाची पाहणी करण्यासाठी हे सर्व जण आणि कर्मचारी तिथे गेले होते. मात्र बाजूचंच एक झाड या सर्वांच्या अंगावर कोसळलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. मुंबईत आज दिवसभरात झाडं कोसळण्याच्या एकूण ९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यात मुंबई शहरात १३ तर पूर्व उपनगरात २२ आणि पश्चिम उपनगरातल्या ५६ तक्रारींचा समावेश होता.

संबंधित व्हिडीओ