सचिन वाझेच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली.. यावेळी वाझेवर UAPA का लावण्यात आला, असा सवाल कोर्टाने केला. त्यावर जिलेटीनच्या कांड्या ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे UAPA लावल्याचं ASG अनिल सिंग यांनी सांगितलं.. वाझेवर गंभीर कृत्य केल्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा आणि त्यासाठी हत्या केल्याचाही आरोप असल्याचा युक्तिवाद करण्यात आला...
त्याचबरोबर वाझे बाहेर आल्यास साक्षीदार आणि पुराव्यांना धोका असल्याची बाजूही ASG यांनी मांडली... दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार असून वाझेचे वकील बाजू मांडणार आहेत.