Ashok Kharat सारख्या दुसऱ्या भोंदूमुळे Nashik पुन्हा हादरलं, महिलेला अर्धनग्न बसवून अघोरी पूजा

नाशिकमधलं अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.. अरुण धोंडू पाटील यांना भोंदू बाबाने पैशांचं आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केलीय.. पीडितेकडून या भोंदूने तब्बल साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलंय. या बाबाने गंगापूर रोडवरच्या बालाजी मंदिर परिसरात अघोरी पूजा केल्याचा आरोप केला जातोय. पीडित महिलेला अर्धनग्न अवस्थेत पूजा केल्याचं समोर आलंय. त्यासाठी तीला पनवेलवरुन डोळ्यावर काळी पट्टी बांधून नाशिकला आणलं गेलं. पीडितेच्या या अघोरी पूजेसाठी मानवी कवटी आणि बोकडाच्या बळीचा वापर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. फसवलो गेल्याचं महिलेला लक्षात आल्यानंतर तीने अंनिसच्या साथीने भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला. Nashik shaken once again by another charlatan like Ashok Kharat; woman forced to sit half-naked during an occult ritual.

संबंधित व्हिडीओ