सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या दमदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली आणि सर्वांची मोठी भांबेरी उडाली.एकीकडे उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. राज्यभरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, शेतकरी आधीच चिंतेत होता. त्यातच आता कुडाळ परिसरात कापणीला आलेल्या आणि पिकलेल्या भात पिकावर अचानक आलेला हा पाऊस कोसळल्यामुळे पिकांची मोठी नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Sindhudurg Rain | Heavy rainfall in Kudal; residents caught off guard by the sudden downpour.