दुष्काळात मुख्यालय सोडणे केजच्या तहसीलदाराला पडले महागात.जिल्हाधिकाऱ्यांच्या दुष्काळी आढावा बैठकीला तहसीलदार गैरहजर जिल्हा अधिकाऱ्यांनी काढला तहसीलदारांचा पदभार दुष्काळी परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करत तसेच दुष्काळाच्या आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याने केज तहसीलदारांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. केज चे तहसीलदार भारत गंगावणे यांचा पदभार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काढला. नायब तहसीलदार अनिल भंडारे यांच्याकडे हा चार्ज देण्यात आला.
Beed | Bharat Gangawane, Tehsildar of Kej, removed from his post; leaving headquarters during a drought proved costly.