नांदेडच्या मुखेडमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीने केलेल्या नुकसानाची भयावह दृश्य आता समोर येऊ लागली.ढगफुटी झालेल्या नांदेडच्या हसनाळ गावात NDTV मराठीची टीम पोहोचलेय, हसनाळ गावात आता सैन्याचं पथक दाखल झालं असून लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली.बचावकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसात या गावातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.हसनाला गावात येताच भारतीय सैन्याच्या सुदर्शन चक्र कोरने कामाला सुरुवात केली आहे. शिवाय पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. हसनाळ गाव अजूनही बऱ्याच प्रमाणात अजूनही पाण्याखालीच आहे, काय आहे परिस्थिती हसनाळ गावाची याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी.