बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी कोमल पवार आणि तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या पवार यांनी मिळून गोपाल उर्फ संजय पवार यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा आरोप आहे. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने दोघांनी हा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अमडापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.