महाराष्ट्रात पुन्हा एकदा रॅपिडोचा मुद्दा तापण्याची चिन्हं आहेत.. राज्यभरात उद्या रिक्षा चालकांनी संप पुकारलाय. रॅपिडोविरोधात रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलीय. रॅपिडोमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला सूट दिल्याचा आरोप करण्यात आलाय. अजूनपर्यंत कोणतीही परवानगी नसताना रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून दुचाकी मोटरसायकलवरून प्रवासी वाहतूक केली जाते, ती आजही सुरू आहे. अनेक संघटनांनी विरोध केला आहे, आयुक्तांकडे पत्रव्यवहारही केला आहे, तरीही पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. याविरोधात आता संघटनांनी संप पुकारलाय.