लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी मंत्र्यांनीच महायुतीला घरचा आहेर दिलाय... लाडकी बहीण योजनेमुळे सद्यस्थितीत सरकारची कसरत सुरू आहे.. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय... अशी गत झालीय असं झिरवाळांनी म्हटलंय.. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील एका कार्यक्रमात झिरवाळांनी हे वक्तव्य केलंय.. आता झिरवाळांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिलीय. काहीही झालं तरी योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.