नेहमी चर्चेत असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी स्पष्ट वक्तव्य केलंय.. मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी स्पष्ट उत्तर दिलं... तुकाराम मुंडे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ विश लिस्टचा भाग आहे. मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो, असं मुंढे म्हणाले. आपण एक लोकसेवक असून लोकांसाठी काम करणं हेच आपलं ध्येय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.