18 अध्यायांची भगवदगीता अवघ्या गळ्यात मावेल इतक्या लॉकेटमध्ये सामावेल का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे..होय.. राजस्थानच्या बीकानेरमधील एका पित्रा पुत्राच्या जोडीने ही किमया साधलीय.. संपूर्ण धर्मग्रंथाचं ज्ञान गळ्यात मावेल इतक्या लॉकेटमध्ये लिहलंय..या लॉकेटमध्ये गोरखपूरच्या प्रसिद्ध ‘गीता प्रेस’ने प्रकाशित केलेल्या भगवद्गीतेतील सर्व श्लोक सूक्ष्म स्वरूपात कोरलेले आहेत. या अद्वितीय कलाकृतीमागील बारकाईची कारागिरी यामुळे अधोरेखित होते. बीकानेरमध्ये अशी हस्तनिर्मित लॉकेट तयार करणारे आपणच एकमेव जोहरी असल्याचा दावा ही पिता-पुत्र जोडी करते. अलीकडच्या काळात या अनोख्या लॉकेटची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्राहकांसाठी हे लॉकेट केवळ दागिना नसून श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रतीक आहे. भगवद्गीतेची शिकवण कायम हृदयाजवळ ठेवण्याचा हा एक सुंदर मार्ग मानला जातो.