आयआयटी बॉम्बे शिक्षणसंस्थेतील आंदोलन आता चांगलंच तापलंय.. साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आंदोलकांकडून कारवाईची मागणी केली जात होती. मात्र सलग तीन दिवस आंदोलन करूनही कोणताच निर्णय घेतला नाही. अखेर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कारवाईला वेग आलाय.. प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून काढण्यात आलंय..