चीननं पुन्हा एकदा लडाखमधील प्रदेशांवर आपला दावा ठोकला आहे. भारतानं अलिकडेच म्हणजे २ ऑक्टोबर रोजी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील २८ सामरिक ठिकाणांची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची अधिकृत नावे निश्चित करून सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर नोंदवली आहेत. भारताच्या वतीने निश्चित केलेल्या २८ नावांमध्ये पर्वत, खिंडी, हिमनद्या, भूभाग, दऱ्या आणि जलस्रोतांचा समावेश आहे. प्रशासकीय, लष्करी आणि महसूल नोंदींमध्ये सुसूत्रता आणणे तसेच लडाखमधील भौगोलिक ठिकाणांची अचूक ओळख स्पष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र त्यावरूनच चीननं हरकत घेतली आहे. चीनच्या मते त्यांनी कधीच लडाखला भारताचा केंद्रशासित प्रदेश मानलेला नाही. यावर भारतानंही जोरदार उत्तर देत चीनचा दावा खोडून काढला आहे. लडाख हा भारताचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग असल्याचं भारतानं ठणकावून सांगितलंय.
China on Ladakh India refutes China's claim Ladakh is an integral part of India what did the Chinese Foreign Minister say