हरियाणा नोह मध्ये पाक हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला. हेरगिरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि आरोपीने सुद्धा कबुली दिली आहे. दोन दिवसांमध्ये दुसरी अटक आहे आणि त्याच मुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध तावडू सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.