हिंगोली शहरामधील जिन माता भागामधील सुधाकर गंगावणे यांच्या घरावर काल रात्री वीज कोसळली. अचानक जोरात आवाज झाल्यामुळे घरातील सर्व भयभीत झाले. घरावर वीज कोसळल्यामुळे गंगावणे यांच्या घरामधील विद्युत उपकरण जळाले. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय तरीही अद्याप प्रशासनाकडून कुणीही दखल घेतलेली नाही.