जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघात नाट्यमय घडामोड घडली आहे. भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सुमित पाटील यांच्या उमेदवारीवर हरकत घेतल्यानंतर हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र विभागीय सहनिबंधकांनी त्यांचा अर्ज वैध ठरवल्यानंतर समीकरणे बदलली. अखेर भाजप नेत्यांच्या समजुतीनंतर सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने पाचोरातील संघर्ष थांबला.