टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या मुख्य टार्गेटवर टायगर श्रॉफ नव्हताच. तपास यंत्रणांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर बॉलिवूडचा एक मोठा सुपरस्टार होता. मात्र, त्या सुपरस्टारची सुरक्षा अत्यंत कडक असल्याने आणि त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य बनल्याने बिश्नोई गँगने आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला. घेतलेली सुपारी वसूल करायचीच होती याच उद्देशाने टायगरवर गोळीबार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. टायगर श्रॉफच्या सोशल मीडिया हँडल्सवरून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं. त्याच्या लोकेशनची रेकी करून अत्यंत नियोजित पद्धतीने हा गोळीबार करण्यात आलाय. मात्र या ट्विस्टमुळे आता संपूर्ण बॉलिवूडमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडालीय.
Major twist in the Tiger Shroff shooting incident; was there never an intention to shoot at Tiger? NDTV gets hold of a big scoop.