रोहित पवारांविरोधातील मानहानीच्या नोटीसवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात उद्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. सभागृहात रमी खेळल्याचा आरोप रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता, त्यामुळे कोकाटे यांचे कृषीमंत्री पद धोक्यात आले होते. या प्रकरणी कोकाटे यांनी पवारांना आठ दिवसांत माफी मागण्याचा इशारा देत मानहानीची नोटीस पाठवली होती.