गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास दीड लाख हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली असून, त्यात कापूस, बाजरी, तूर आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी त्यांच्याच मतदारसंघात पाहणी दौरा केला, मात्र तरीही शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल संताप आहे. असे का घडले, याचा हा सविस्तर रिपोर्ट.