मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणखी एका अॉडीओ क्लिपचा बॉम्ब फोडणार असल्याचे सुतोवाच केल आहे.पुढच्या क्लिपने फडणवीस साहेब व शिंदे साहेबाना शॉक बसेल त्यामुळे त्यांनी अगोदरच्या क्लिपचा शोध घ्यावा, एसआयटी चौकशी सगळं मान्य करा भाजपने शिंदे साहेबावर वार का केला किंवा भाजपने हे कृत्य का केलं हे मान्य करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून पहिल्या ऑडिओ क्लिप बाबत अद्याप मला कुठलीच चौकशी विचारणा झाली नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.जरांगे पाटील यांनी आज येडशी येथील जळीत काळात मृत्युमुखी पडलेल्या करंडे कुटुंबाची भेट घेतली त्यावेळी माध्यमातून संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहेत.