रायगडात Shivsena-NCP संघर्ष तीव्र, Sunil Tatkare यांच्या खासदारकीला आव्हान

रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माणगाव येथील पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीला थेट आव्हान दिलं. रायगडचा खासदार, श्रीवर्धनचा आमदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे झाले पाहिजेत, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला चितपट करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केलं. यावेळी सुनिल तटकरे यांच्या खासदारकीलाही आणि आदिती तटकरे यांच्या आमदारकीलाही घोसाळकर यांनी खुलं आव्हान दिलं.

संबंधित व्हिडीओ