Ganesh Naik यांचा DNA चेक करा, आमदार मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना इशारा | NDTV मराठी

वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील विस्तव जाता जात नाही. नवी मुंबईकरांच्या गरजेची असलेली शहरातील अनेक कामे मी आमदार म्हणून मंजूर करून आणल्या नंतर त्याला विरोध करायचे काम येथील भाजपाचे नेते करीत आहेत. रूग्णालय , लॅब्ररी, मरिना सेंटर , स्टेडियम अशी शहरवासीयांसाठी गरजेची कामे सरकार कडून मंजूर केली आहेत. यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे . याला विरोध करून ती कशी होणार नाहीत याची काळजी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक घेत आहेत. भाजप आमदारांच्या कामाला भाजपचा मंत्री विरोध करीत असल्याने हे नक्की भाजपाचे आहेत का याची डीएनए टेस्ट करायला पाहिजे असा गंभीर आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय

संबंधित व्हिडीओ