Ratnagiri | माशांचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका, मासे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा हिरमोड

दिवाळीची सुट्टी आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी ताज्या माशांच्या खरेदीसाठी दापोलीतील हर्णे बंदराला पसंती दिली आहे. मात्र, माशांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. माशांची घटलेली आवक आणि वाढलेली पर्यटकांची संख्या यामुळे दरांनी थेट उच्चांक गाठला आहे. चार दिवसांपूर्वी ६०० रुपये किलो मिळणारी सुरमई आता १३०० ते १७०० रुपये, तर पापलेट ७०० रुपयांवरून थेट १८०० रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. कोळंबीचे दरही ३०० वरून ८०० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे ताज्या माशांच्या अपेक्षेने आलेल्या खवय्ये पर्यटकांना मात्र महागाईचा चांगलाच फटका बसला आहे.

संबंधित व्हिडीओ