नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग अखेर चार दिवसानंतर नियंत्रणात आलेली आहे. आता या ठिकाणी फक्त कलिंग ऑपरेशन सुरु आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली. चोपन्न तासांपेक्षा अधिक वेळ ही आग धुमसती होती. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ही आग लागलेली होती. आता धोका पूर्णपणे टळलेला आहे.