धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करताय. गोरंट्याल यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय. दरम्यान धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीने पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे.