उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे.येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास 27 मे नंतर त्यापुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.