सोलापूर जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले असून प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिला आहे. जिल्ह्यात सध्या ९२ गावे पाणी टंचाईने होरपळत असून या भागांत ८२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात केवळ १२० दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाने सोलापूरबाहेर चारा वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. पुढील १२० दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे