विदर्भात अभयारण्यातील वन्यप्राणी हे जंगलाच्या बाहेर येऊ नये यासाठी तृणभक्षी प्राण्यांचे नियोजन करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. अभयारण्याच्या सीमेवर उन्हाळ्यातही हिरवेगार राहतील अशी झाडे लावली जातील, असे कृषीराज्यमंत्री आशिष जेस्वाल यांनी सांगितले आहे. जंगलातील घातक वनस्पतीही बाजूला केली जातील, असे वनविभागासोबतच्या बैठकीत निश्चित झाल्याचे जेस्वाल यांनी सांगितले. यासंदर्भात कृषीराज्यमंत्री आशिष जेस्वाल यांच्यासोबत संवाद साधला, आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.