नागपूर शिक्षक भरती घोटाळा अपडेट हाती येतेय. शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची आता ईडीकडून देखील दखल घेण्यात आली आहे. ईडीने या घोटाळ्याशी निगडित माहिती पोलिसांकडून मागविली आहे.तर या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी एसआयटी देखील स्थापित करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी निगडित असलेल्यांना आता घाम फुटला आहे.. त्यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे भांडे फुटण्याची शक्यता आहे.