Malegaon Election| अजित पवार खरंच चेअरमन होणार? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान

बारामती- बहुप्रतिष्ठित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. एकूण 21 संचालकांसाठी हे मतदान होत आहे. एकूण ३७ गावं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असून १९ हजार ७५० मतदार मतदान करतील... या निवडणुकीत एकूण चार पॅनल मैदानात आहेत. विशेष म्हणजे निळकंठेश्वर पॅनलकडून ब वर्ग प्रतिनिधी म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार आहेत. शरद पवार पक्षाचं बळीराजा सहकार बचाव पॅनलही या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या पॅनलचे एकूण २० उमेदवार मैदानात आहेत. पवारांच्या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत आहेत. दुसरीकडे भाजपचा तावरे गटही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून २१ उमेदवार मैदानात आहेत. याशिवाय अपक्षांचा एक गट दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असून त्यांचे १५ उमेदवार मैदानात आहेत. या सर्व ४ पॅनलचं भविष्य आज मतपेटीत बंद होईल.

संबंधित व्हिडीओ