अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला चढवला आहे.इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो,नतांज, इस्फाहन ही अणुतळं उद्ध्वस्त केली आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्वीट करुन इराणवरील हल्ल्याची माहिती दिली.दरम्यान अमेरिकेनं हल्ल्यात B-2 बॉम्बचा हल्ला केल्याची माहिती मिळतेय.थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प संबोधित करुन हल्ल्याविषयी माहिती देणार आहेत.