Nalasopara| गरब्यात Love Jihad? गरबा आयोजकांकडून टिळा लावणाऱ्यांनाच प्रवेश; टिळा पुसणाऱ्यांना चोप

नालासोपारा पूर्वेतील ओसवाल नगरी येथे न्यू सहयोग सामाजिक सेवा संस्थेच्या नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमात एका तरुणाच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला आहे. सदर तरुण ओळख लपवून गरब्यात आल्याने आयोजक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार, बुधवारी संध्याकाळी कपाळावर टिळा लावून गरबा स्थळी आलेल्या तरुणाने आधारकार्ड तपासणीदरम्यान लक्ष वेधले. त्यानंतर त्याने कपाळावरील टिळा पुसल्याचा आरोप स्वयंसेवकांनी केला, यावेळी तेथील स्वयंसेवकांनीत्याला चोप दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, नालासोपारा येथील कथित लव जिहाद आणि गरीब्यातील हिंदू तरुणींना लक्ष्य केल्याचे प्रकारण ताजे असताना या घटनेमुळे हा वाद चिघलण्याची शक्यता1 निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत चौकशी करण्याची मागणी आयोजकांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ