अंजली दमानियांनी धनंजय मुंडे यांच्या काळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.यावेळी त्यांनी इफको कंपनीच्या नॅनो युरियाची एक बाटली बाजारात 92 रूपयांना मिळत असताना 220 रुपये दराने खरेदी केल्याचा देखील दावा केला.पण धंनजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.दरम्यान खरचं इफको कंपनीच्या नॅनो युरियाची एक बॉटल किती रुपयांना मार्केटमध्ये विकली जाते याची रियालिटी चेक करण्यासाठी आमची टीम थेट कृषी केंद्रात पोहोचली.यावेळी दुकानदारांनी या औषधाची किती किंमत सांगितली तुम्हीच पाहा.