महाराष्ट्राच्या आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्याबद्दल तुम्ही काय विचार करता... त्यांची कामं, त्यांचे पक्ष, त्यांचं राजकारण वगैरे वगैरे ना? पण हे मुख्यमंत्री जादुटोण्यामध्ये विश्वास ठेवतात का, त्यांना जादूटोणा येतो का, ते जादूटोण्याला घाबरतात का असा प्रश्न तुम्हाला पडत नाही ना.. मग आता तुम्हाला या प्रश्नांची सवय करून घ्यायला हवी.... कारण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपण दिलेल्या मतांमुळे नाही तर जादूटोण्यामुळे मिळते असे दावेच आपले राजकीय नेते करू लागलेत....