अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्यात शासकीय विश्रामगृहावर बंद दाराआड महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी झालेल्या या बैठकीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरू असताना समन्वयाचा अभाव आणि राजकीय मतभेद हे मोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे.