महाशिवरात्री निमित्त बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.मध्यरात्रीपासून भक्तिभावानं शिवभक्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल होत आहेत.12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं असलेलं हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यामुळेच या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.त्यामुळे देशातील अनेक शिवभक्त आवर्जून वेरूळ इथं येतात.दरम्यान घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.....