विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.