यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीला गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या पूरस्थितीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज नदीच्या पाण्याची पातळी १२ मीटरपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे संगम चिंचोली, करोडी, पळशी आदी गावांना पुराचा वेढा बसला आहे. दरम्यान, काही तासांपासून पावसाने उसंत घेतल्याने पूरग्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र नदीपात्रातील पाण्याचा जोर कायम असल्याने प्रशासन सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.