भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे बीड जिल्हा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.भाजपाकडून हा निर्णय घेण्यात आला असून एक प्रकारे बीड जिल्ह्याचे पालकत्व पंकजा मुंडे कडे देत पक्ष नेतृत्वाने आमदार सुरेश धस यांना देखील या माध्यमातून संदेश दिल्याचे बोलले जात आहे.काही दिवसापासून सुरेश धस हे पंकजा मुंडे यांना देखील टिकेचे लक्ष करत असून या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपने बीड जिल्हा संपर्क मंत्रिपदाची दिलेली जबाबदारी पाहता याची आता जोरदार चर्चा बीडच्या राजकारणात होऊ लागली आहे.