नाशिक महानगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडून महापौर-उपमहापौरांना घरचा आहेर देण्यात आला... प्रभागातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनीच प्रशासनाला धारेवर धरलं.. महापौर तुम्ही आमच्या प्रभागात खड्डे बुजवून गेलात, दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले, अशा शब्दात नगरसेवकांनी जाब विचारलाय.. खड्डे बुजवण्याच्या कामाच्या दर्जावर सत्ताधारी नगरसेवकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.त्याचबरोबर महासभेत खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापौर-उपमहापौरांसमोर सत्ताधारी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलीय..