अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिक्षकांना बळजबरीने प्रचारात उतरवलं जात असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षकांचा राजकारणासाठी वापर करणाऱ्या संस्थांची SIT चौकशी करू, असा इशारा त्यांनी दिला. विशिष्ट उमेदवाराला मत देण्यासाठी शिक्षकांवर सक्ती होत असल्याची तक्रार आल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
Politics heats up over the Amravati Teachers' constituency; Bawankule also turns aggressive following serious allegations by Anil Bonde