भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये विचारलेत चौदा प्रश्न. एखादा घटनात्मक पेच असेल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. पण सध्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला जे प्रश्न विचारलेत त्याला पार्श्वभूमी आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निकालाची. हा निकाल राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांसंदर्भात आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांना घटनेनं दिलेल्या अधिकारांबाबतच्या विविध तरतुदींबाबत स्पष्टीकरण विचारणारे प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केलेत. निकाल नेमका काय आहे आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी विचारलेले प्रश्न काय आहेत? या सगळ्याबद्दलचा हा रिपोर्ट.