राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी सगळे राजकीय पक्ष प्रयत्न करतायत. आणि यामध्ये मनसेची भूमिका काय असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातायत. मनसे शिवसेनेसोबत यावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यांचे नेते त्यासाठी प्रयत्न करतायत. मनसे सोबत आली तर किती जागा द्यायच्या याही बाबतीत चर्चा सुरु आहेत.